आळते (ता. हातकणंगले) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान तीन ठिकाणी घरफोडी झाली तर दोन ठिकाणच्या दुचाकी चोरुन नेल्या. याप्रकारामुळे ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे.आळते येथील चौगुले स्टॉप जवळ विलास बनकर, इकबाल मुजावर, सुनिल मलमे यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील प्रापंचिक साहित्य सोने- चांदीचे दागिने, नवीन साडया तसेच अंकलीकर मळा येथे डॉ. सुशांत अंकलीकर यांची हंक गाडी (एम. एच. ०९ बीएस ९२३८) व धनंजय पाटील यांची डिस्कवर गाडी (एम. एच. ०९ बी वाय ८८१८) अशा दोन मोटार सायकली असा १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले.
एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती हातकणंगले मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सेना महाराज मंदिरात भजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी स्पिकर वरून लोकाना सावध रहा, जागे राहण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील जावेद मुजावर, तय्यब मुजावर, अमन मुजावर यानी मळे भागात येवून नागरिकाना उठवून घटनेची माहिती दिली.