गेल्या काही वर्षापासून वस्त्रोद्योगांसंबधीचा हा निर्णय प्रलंबित होता. निर्णय झाल्याने वीज बिलातील या अतिरिक्त सवलतीमुळे राज्यातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अध्यादेशानुसार यंत्रमागधारकांना आजपासून विज बिल सवलत लागू झाली आहे.
इचलकरंजीतील २७ एचपी वरील अत्याधुनिक यंत्रमागांना ७५ पैसे आणि २७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपया वीज सवलतीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांनी दिली.
२७ एचपीपेक्षा जास्त परंतु २०१ एचपीपेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैसे त्याचबरोबर २७ एचपी पेक्षा कमी जोड भार असलेल्या परंतु २०१ एचपीपेक्षा कमी जोडभार असलेल्या साध्या यंत्रमागांना एक रुपया वीज सवलत लागू केली आहे. ही योजना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २८ या कालावधीपर्यंत लागू असणार आहे.