इस्लामपुरात राष्ट्रवादीतर्फे मालवण घटनेचा निषेध मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने येथील तहसील कचेरी चौकात मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळा घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेची जबाबदारी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटूगडे, सुशांत कोळेकर, सुशांत कुऱ्हाडे, विशाल माने यांनी या घटनेचा निषेध करीत सरकारवर हल्ला चढविला.