अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन याने चित्रपटाची टीझर आणि रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे.कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट भूल भुलैया 3 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी एकत्र झळकणार आहेत.
या चिचत्रपटाच्या टीझरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता कार्तिक आर्यन याने भुल भुलैया चित्रपटाच्या टीझरबाबत मोठा खुलासा केला आहे. कार्तिक आयर्नने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर करत सांगितलं आहे की, लवकरच या चित्रपटाची टीझर लाँच करण्यात येणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ 2022 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
तेव्हापासून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच ‘भूल भुलैया 3’ची मागणी होती. कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाबद्दल बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, “भूल भुलैया 3 चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने यासाठी मी खूप उत्साही आहे”.