वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेलेल्या १ हजार २५ हेक्टर शेतीचे कृषी विभागामार्फत पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती वाळवा तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी दिली.वाळवा तालुक्यातील भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले.
पुरामुळे तालुक्यातील १ हजार २५ हेक्टर क्षेत्रातील पाण्याखाली गेलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले.पंचनामे केलेल्या पिकांमध्ये सोयाबीन २३२ हेक्टर, भुईमूग २११, भात १७, भाजीपाला ९, ऊस ५५४, हळद एक हेक्टर, केळीचे एक हेक्टर क्षेत्र आढळून आले आहे. उर्वरित पंचनामेही पूर्ण केले जाणार आहेत. पूरकाळात आठ दिवस उभी पिके पाण्याखाली गेल्याने ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले.