इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे देवच सध्या असुरक्षित बनले आहेत.चोरट्यांनी दानपेट्या पळवणे,दागिने चोरणे याचा सपाटाच लावला आहे.शहरातील घरे असुरक्षित असल्याची भावना ताजी असतानाच चोरट्यांनी आता मंदिरावर ही लक्ष केंद्रित केल्याने आता पोलिसांपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आभूषणे, रोख रक्कम चोरून नेली.

या घटना ताजी असताना दोन दिवसांनी शिवाजीनगर हद्दीत श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून दानपेटी पळवली. शहरातील मंदिरे चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.मागील सहा महिन्यांपासून शहरात चोरीचे, घरफोडीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहे.त्यामुळे भाविकांमध्ये असुरक्षेततेची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे देवस्थान प्रशासनाने मंदिर सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर दिला आहे. काही मंदिरांमध्ये रात्री सुरक्षारक्षक तैनात करण्याचे नियोजन केले आहे.