तांदुळवाडी येथे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते चिंतीत आहेत.कुंडलवाडी मालेवाडी बहादूरवाडी कनेगाव भरतवाडी ही गावे येत असून या गावातील शेतकऱ्यांची शेती वारणा नदी पात्राशेजारी आहे. या शेजारी असणाऱ्या शेतीमध्ये सध्या पडणाऱ्या पावसाने ओढे ओघळी भरून पाणी वाहत आहे. हे पाणी नदीला समाविष्ट होते, पण वारणा नदी चांदोली धरण क्षेत्रातून प्रवाहित होते तेथे जोरदार पाऊस पडत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. याचा परिणाम या नदीला समाविष्ट होणारे ओढ्या ओगळीचे पाणी फुगी धरून राहिले आहे. ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात विस्तारलेले गेले आहे. या अगोदर मागील महिन्याच्या शेवटी आलेल्या ही याच पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले होते असे दुसऱ्या वेळी शेतातील पिकांत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे मागील महिन्यातील पूरस्थितीत कसे बसे वाचलेली पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे.