शितलताईसह बाबर गट ऍक्टिव्ह! जोरदार तयारी सुरू….

विटा मतदारसंघातील छोट्या मोठ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर बाबर गट चांगलाच ॲक्टिव्ह झाला असून ॲड. डॉ. शितलताई बाबर यांच्या उपस्थित नागनाथ नगर येथे महिलांचा भव्य मेळावा पार पडला. सरपंच सतीश निकम आणि हणमंत तात्या निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा संपन्न झाला. यावेळी संजय गांधी निराधार योजना आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाकडून जोरदार नियोजन करण्यात आले.

यावेळी आशा सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना रक्षाबंधनची भेट देखील देण्यात आली. तर शितलताई बाबर यांनी बचत गटाच्या विविध प्रश्नावरती महिलांसोबत चर्चा करून महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर आज पर्यंतच्या इतिहासात नागनाथ नगर येथे हा सर्वात मोठा मेळावा पार पडला असून या मेळाव्यासाठी आलेल्या सर्व माता भगिनी आणि वडीलधारी मंडळींचे सरपंच सतीश निकम यांनी आभार मानले.