रुकडीत उद्या रविवारी खासदार दहीहंडीचे आयोजन! ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी….

हातकणगले तालुक्यातील रुकडी, येथे खासदार धैर्यशील माने दादा प्रेमी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या गोविंदा पथकास रोख रक्कम १ लाख ११ हजार १११ रु. पारितोषिक देण्यात येणार आहे. खासदार दहीहंडी या नावाने ही दहीहंडी ग्रामीण भांगामध्ये प्रसिद्ध आहे. मागील वेळीच्या यशस्वी नियोजनामुळे या वेळी महाराष्ट्रातील मोठे गोविंदा पथके या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केले आहेत त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होणार आहे.

खासदार दहीहंडीचे खास आकर्षण मर्दानी खेळ, लेसर शो, डॉल्बी व फटाक्याची आतषबाजी असणार आहे. महिलांना बसन्यासाठी स्वातंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन विक्रम पाटील, साहिल कलावंत, शितल खोत, सचिन इंगले, सादिक मुल्ला, शमूवेल लोखंडे, अनिल बागड़ी- पाटील, नदीम मुजावर, सूरज पाटिल, निखिल निकम, राजू सुतार, शादाब पटेल, आनंदा बागडी यांनी केले आहे.