महाविकास आघाडीसोबत महायुतीने देखील राज्यातील सर्वच जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तर निर्णयावर अवलंबून न राहता महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी सर्वच जागेवर स्वतंत्र चाचपणी केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात तीच परिस्थिती आहे.सध्या विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर जवळपास एकमत झाले आहे, असे असताना शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीची धाकधूक आतापासूनच वाढवली आहे.
जयसिंगपूर येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आमदार पाटील-यड्रावकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत तेही महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात.नुकत्याच जयसिंगपूर येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी, मी कालही अपक्ष होतो, मी आज अपक्ष आहे उद्याही अपक्षच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.