MVA Seat Sharing: मविआचं विधानसभा निवडणुकीचं जागावाटप कधी होणार?

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी जागावाटपाची (MVA Seat Sharing) चर्चा अजून पुढे सरकलेली नाही. त्यामुळे निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली तरी तीन पक्षांचा समावेश असलेल्या दोन्ही आघाड्यांचे जागावाटप कसे पार पडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नाना पटोले यांना जागावाटबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आमची निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) तयारी सुरु झाली आहे . मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय गणपती उत्सवानंतर होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले.