टीम इंडियाने इंग्लंडला लोळवलं! मालिकाही जिंकली

रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही (Ranchi Test) तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली. सलामीवीर शुभमन गिलचं (Shubman Gill) संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची (Dhurv Jurel) पुन्हा चमकदार खेळीमुळे, भारताने चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला.

चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. साहेबांचं लक्ष्य स्वीकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. मात्र आज आघाडीची पडझड झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती. पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त खेळी करत, टीम इंडियाला विजय मिळवून दिला.