1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 4500 नव्हे तर फक्त….

राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे. कारण, राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिले आहेत. मात्र 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.