ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायबच होता. यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला होता.पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब रावांनी सप्टेंबर मध्ये पाऊस मैदान गाजवणार असे म्हटले होते.
सप्टेंबरच्या दोनच दिवसात पावसाने दाणादान उडवली.अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे चार तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण, पावसाचा जोर आजपासूनच कमी होणार आहे.
आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कमी राहण्याची शक्यता आहे. सात सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
8-9 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 8-9 सप्टेंबरला जो पाऊस राहील तो पाऊस मोसमी पाऊसचं राहणार आहे. परतीचा पाऊस राहणार नाही.यानंतर त्यांनी 12-13 सप्टेंबरला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
म्हणजे पंजाब रावांच्या अंदाजावरून यावर्षी परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होणार असे दिसत आहे.भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार असा अंदाज दिला आहे. आता पंजाब रावांनी देखील तसेच संकेत दिले असल्याने यंदा सप्टेंबरमध्येही आणि ऑक्टोबरमध्येही चांगला पाऊस होईल असे चित्र तयार होत आहे.