पीएम किसानचा 18 वा हप्ता या दिवशी होणार जारी! त्वरित करा….

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 18 व्या हप्त्यासाठी त्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात 18 वा हप्ता जारी करू शकते, असे सांगितले जात आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, तुम्हाला १८ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे लवकरच ई-केवायसी पूर्ण करा.