खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार पडळकरांनी वाढवली ताकद…..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागलेला आहे अनेक मतदारसंघांमध्ये नेते मंडळींची रेलचेल वाढलेली आपणाला पाहायला मिळत आहे. तसेच अनेक विकास कामांसाठी निधी देखील मंजूर करण्याकडे नेते मंडळींनी आपला मोर्चा वळवला आहे. अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघात पडळकर बंधूंनी आपली ताकद वाढवलेली पाहायला मिळत आहे.

खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी विकास कामांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आमदार गोपीचंदजी पडळकर आणि ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या माध्यमातून पळशी गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार पळशी येथे तब्बल 43 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी केले आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुहासदादा पाटील आणि आमदार पडळकर यांचे खंदे समर्थक पैलवान सत्यजित भैय्या पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी ग्रामस्थांसह पैलवान सत्यजित भैय्या पाटील यांनी आमदार गोपीचंदजी पडळकर यांचे आभार मानले.