खानापूर परिसरात मध्यम पावसाची हजेरी! पिकांच्या काढणीवर होणार परिणाम

खानापूर घाटमाथ्यावरील खानापूर, सुलतानगादे, हिवरे, पळशी, करंजेसह अनेक गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या परिसरातील निर्यातक्षम द्राक्षबागा या फुलोऱ्यात असून या पावसामुळे या बागांच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिसरात संकरित ज्वारी, मका व भुईमूग या पिकांची काढणी जोरात सुरू आहे.

या पावसामुळे या पिकांच्या काढणीवर परिणाम होणार आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या गहू व हरभरा या पिकासाठी पोषक आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरात सुरू असलेल्या ऊस तोडणीवर याचा परिणाम होणार आहे.