लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिलेले आहे.विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात सध्या सध्या मेळावे यांचे आयोजन देखील करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.चलकरंजीतून अपक्ष आमदार ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत.
कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांच्यानंतर आता आवाडे घराण्याने तिसर्या उमेदवाराची म्हणजेच राहुल आवाडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तेथे महाविकास आघाडीअंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे तर काँग्रेसकडून संजय कांबळे व राहुल खंजिरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
शरद पवार राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव सुहास जांभळे इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने इच्छुक आहेत. भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर मोर्चेबांधणी करीत आहेत तर आवाडे यांनी उमेदवारीसाठी आपण कोणाच्या दारात जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राहुल आवाडे हे शिंदे शिवसेनेतून उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे.