इचलकरंजीत शनिवारी सिध्दीविनायक भक्त मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम

इचलकरंजी शहरात अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. इचलकरंजी येथील सिध्दीविनायक मंदीरात गणेश जयंतीनिमित्त भरगच्च असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. २४ जानेवारीपासून हा सोहळा संपन्न सुरुआहे. सकाळी ७.३० ते ११ च्या दरम्यान दररोज ज्ञानेश्वरी पारायण होत असून त्याचबरोबर जनजागृती भारूड, खेळ पैठणीचा आदी मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पडले. जीवन विद्या मिशनच्यावतीने उपासनी यज्ञ पार पडला.

आनंदराव पवार यांचे विचारांचे सामर्थ्यावर व्याख्यान झाले. हरीप्रिया महिला भजनी मंडळाचा श्री गणेश नामावली कार्यक्रम झाला. सद्गुरू वामनराव पै यांचे सात शिष्य विकास नाईक यांचे आदीमन येई हाती… तोच गजराज गणपती यावर व्याख्यान झाले. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता जलकुंभ दिंडी तर दुपारी १२ वाजता जन्मकाळ व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक दिलीप मुथा व सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.