कोल्हापूर तसेच सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमदेवार जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार तातडीने जाहीर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसेचे नेते आम. सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा ही उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे आहे. त्यानुसार महाविकास आघाडीने याबाबत तातडीने उमेदवार जाहीर करणे अपेक्षीत आहे.
मात्र वरिष्ठ महाविकास आघाडीच्या बैठकी प्रसंगी पातळीवरील बैठकांच्या सत्रामुळे यास विलंब होत आहे. तेव्हा लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सध्या महाविकास आघाडीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चांगले वातावरण आहे. या चांगल्या वातावरणाचा फायदा मतपेटीपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहु. इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असणार याची चिंता नाही तर महायुतीचा उमेदवारास पराभूत करणे हा आमचा उद्देश असल्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.