IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी! ग्रे-मार्केटमध्ये मोठी चर्चा

सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

लवकरच पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.या कंपनीचा IPO 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.पीएन गाडगीळ ज्वेलर्स ही कंपनी 2013 मध्ये स्थापन झाली होती.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स ही कंपनी मुख्यतः सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरीसह मौल्यवान धातूचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी पुणेस्थित आपल्या ग्राहकांना मेड-टू-मेजर ज्वेलरी बनवण्याचा पर्याय देते.पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO साठी शेअर्सची किंमत बँड 456-480 रुपये निश्चित केली आहे.

या कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 180 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक 660 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. या कंपनीचा IPO स्टॉक 17 सप्टेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो. या IPO चा आकार 1100 कोटी रुपये आहे.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स या महाराष्ट्रस्थित कंपनीच्या IPO मध्ये 850 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स वाटप केले जाणार आहेत. तसेच SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार असल्याची माहिती दिली आहे.सध्या एसव्हीजी बिझनेस ट्रस्टकडे पी एन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचे 99.9 टक्के भागभांडवल आहे.

ही कंपनी IPO मधून मिळणारी रक्कम व्यवसाय विस्तार योजना आणि कर्ज परतफेडीसाठी खर्च करणार आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, IPO इश्यूनंतर या कंपनीचे बाजार भांडवल 6,500 कोटी रुपयेपेक्षा जास्त वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.