पंढरपूर, मंगळवेढा शहरातील विकास कामांसाठी प्रत्येकी पाच कोटी निधी मंजूर!

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी पाच असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर 25 लाख तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 15 लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील 40 तर पंढरपूर शहरातील 47 कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.