महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी बारामतीतून येत आहे. उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत.तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे.
आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या भाषणातून खळबळ उडवून दिली आहे. तसेच इतकी विकासकामे करूनही बारामती लोकसभेत आमचा पराभव झाला अशी खंतही अजित पवारांनी मांडली.अजित पवार पुढे म्हणाले, बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत.
विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. काही चूकत असेल तर मला सांगा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती.
मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते मान्य केलं पाहिजे. कोणतिही निवडणूक असो, त्या निवडणुतील यश हे कार्यकर्त्यांच्या जिवावर अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळं मिळाली.