गेल्या काही दिवसापासून सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, नागरा, बलवडी, चोपडी, जवळा याबरोबरच अनेक गावातील परिसरात रात्री अपरात्री आकाशामध्ये ड्रोन हे निदर्शनास आलेले आहेत. चोर हे ड्रोनच्या माध्यमातून चोरी करण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा या अनेक गावांमध्ये पसरत आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला, नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
तसेच ड्रोनच्या बाबतीत सोशल मीडियावर देखील वेगाने अफवा पसरत असल्यामुळे असुरक्षितता वाढू लागलेली आहे.
त्यामुळे या ड्रोनचा लवकरात लवकर खुलासा करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.