गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा!

गौरी-गणपती सणानिमित्त राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. येत्या आठ दिवसांत आनंदाचा शिधा वाटप होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.५ लाख ९४ हजार शिधा संच मंजूर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा वाटप बंद होते. आता आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे.संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.