गुड आवाजाने सांगोला हादरला! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, बलवडी, नाझरा, चोपडी, चिनके, घेरडी, हंगिरगे, वाकी, आलेगाव, जवळा आणि काल सोमवारी सांगोला शहरातील गावडेवाडी परिसरात सकाळी तर इतर रात्री आकाशात अनेक ड्रोन घिरट्या घालत असताना निदर्शनास आले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून चोर हे चोरीची तयारी करत असल्याच्या अफेवेमुळे सांगोला तालुक्यात रात्रभर महिला, लहान मुले, वयोवृद्ध, नागरिक भयभीत होत आहेत.

तसेच सोशल मीडियावर देखील ड्रोनच्या बाबतीत अनेक अपवाद देखील पसरत असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत आणखी असुरक्षितता वाढू लागलेली आहे. यामध्ये सोमवारी सकाळी गुड आवाजाने सांगोला हादरून गेला. गणेश उत्सवादरम्यान अनेक मंडळाकडून श्री ची आरती सुरू होती. तर अनेक जण आपल्या कामांमध्ये व्यस्त असताना हा आवाज आला.

दरम्यान नागरिकांनी आपापली हातातली कामे जागेवरच ठेवून घराबाहेर पडला. अनेकांनी तर या आवाजाच्या दिशेने तर्कवितर्क अंदाज वर्तविला आहे. सांगोला तालुक्यातील बहुतांशी भागात हा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात चौकशी केली असता वाढेगावच्या दिशेने आवाज आल्याची माहिती मिळालेली आहे. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी वाढेगाव येथे चौकशी केली सदर ठिकाणी इतर कोणतीही माहिती मिळालेली नाहीये परंतु आवाज आल्याची माहिती तेथील नागरिकांनी पोलिसांना दिली.

सदरचा आवाज हा फायटर विमानाचा आवाज असल्याची चर्चा आहे. त्यानुसार पोलिसांकडून फायटर विमानाचा आवाज असू शकतो अशी तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे.