लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्ष हा आपापली मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात नवीन नोंदणीनुसार चार हजार ४५० पुरुष मतदार, तर चार हजार ७१० स्त्री मतदार तसेच सैनिक मतदारांमध्ये ८९५ पुरुष मतदार, तर २५ स्त्री मतदार असे एकूण नऊ हजार १६० नवीन मतदार संख्या वाढली आहे.
त्यामुळे सन २०२४ च्या प्रारूप मतदार यादीनुसार सांगोला तालुक्यात पुरुष मतदारांची संख्या एक लाख ६१ हजार ३५२, तर स्त्री मतदारांची संख्या एक लाख ४६ हजार २८८ अशी एकूण तीन लाख आठ हजार ५६० मतदार संख्या निश्चित झाल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक पात्र स्त्री व पुरुष मतदाराला एका मताचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क दिला आहे.