मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. जरांगे १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मनोज जरांगे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटीले हे गेल्या अनेक दिवसांपासून आग्रही भूमिका मांडत आहेत. अनेकदा त्यांनी उपोषण देखील केलं आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी सरकारकडून मान्य झालेली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.