शासन निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार नागरिक सहभाग, संपूर्ण स्वच्छता आणि सफाई, मित्र सुरक्षा शिबिर या प्रमुख उपक्रमांद्वारे विविध स्वच्छता विषय जनजागृतीसह चार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छता हीच सेवांतर्गत 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पंधरावडा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता, संसार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येणार आहेत.
याअंतर्गत स्वच्छ कॉलनी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, विद्यालय व श्री गणेशोत्सव मंडळ या पाच गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले आहे.