हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये उमेदवारीबद्दल चुरस निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्तीमध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे.
महायुतीमध्ये हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला जाण्याची शक्यता आहे.त्यांच्याकडे अशोकराव माने हे उमेदवार असू शकतात. कारण 2019 चे विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघातून लढवली होती.
यंदा या मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा डोळा असल्याने अशोकराव माने सांगा कोणाचे? अशी विचारण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर आमदार विनय कोरे, माजी आमदार अमर महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी असलेल्या जवळीकतेने हा सवाल आणखी गडद होत चालला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिंनचेकर यांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न करत आहे.निवडणुकीच्या तोंडावर मिनचेकर हे शिंदे गटात जाण्याचे चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहिली तर विधानसभा मतदारसंघात जग सुराज्य शक्ती की भाजपकडून माने हे निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.