हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावांमध्ये मोहम्मद पैगंबर जयंती ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी गावामध्ये पूर्ण दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजातील तरुणांनी रुकडी ग्रामपंचायतकडे केलेली आहे. मोहम्मद पैगंबर यांनी अमन, शांती व भाईचारा हा संदेश जगाला दिला.
त्यांच्या जन्म जयंतीनिमित्त एक दिवस संपूर्ण रूकडी गावातील दारू दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी करण्यात आली आणि रुकडी गावातील संपूर्ण दारू दुकाने सोमवारी एक दिवस पूर्णपणे बंद करण्यात येतील असे आश्वासन रूकडी गावच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री रूकडीकर यांनी दिले.
त्याचबरोबर या जयंतीनिमित्त अझर स्पोर्ट्स रुकडी या मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सायकलिंग शर्यत, 19 वर्षाखालील तरुण मुलांच्या धावणे शर्यती, बुंदी वाटप तसेच मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केलेले आहे.