हातकणंगले विधानसभा (राखीव) मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे, महायुतीचे अशोकराव माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुजित मिणचेकर या प्रमुख राजकिय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत. काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. हातकणंगले विधानसभा (राखीव) मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७५.५ टक्के इतके मतदान किरकोळ अनुचित प्रकार वगळता ३३४ केंद्रावर शांततेत पडले.
सकाळपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारच्या वेळी थोडीशी मतदानाची गती मंदावली, मात्र यानंतर परत मतदानास वेग आला. काही मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्या नंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजले पासुन मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. काही मतदान केंद्रावर सायंकाळी पाच नंतर मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे सहा नंतर ही मतदान प्रक्रीया चालू ठेवावी लागली.
मात्र, नियमानुसार सहा नंतर येणाच्या मतदारांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. एकूण सरासरी ७५.५ इतके टक्के मतदान झाले असून मात्तब्बर उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले असुन निकालानंतरच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार असुन कोण वरचढ ठरणार हे २३ तारखेस मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.