सावत्र आईने मुलीला उलाथण्याने दिले चटके! नात्याला काळीमा फासणारी घटना…….

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे सावत्र आईने किरकोळ कारणांवरून पाच वर्षांच्या मुलीला गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ उलाथणे तापवून चटके दिले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.शुभम मोकिंदराव मगरे (सध्या रा.कासारवाडी, मूळगाव शहापूर धांडेगाव, ता. अंबड, जि. जालना) हे दुसरी पत्नी पूजा व दोन मुलांसह भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. शुभम व पूजा यांचे दुसरे लग्न असून, दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्ये आहेत.

शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी पूजा मगरे हिने पाच वर्षीय मुलगीने अंथरुणावर लघुशंका केल्याच्या कारणास्तव रागाने उलाथणे आगीवर तापवून चटके दिले. यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरती अंगावरती जखमा झाल्या आहेत. याबाबतची फिर्याद शुभम मगरे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पूजाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.