दिवाळी तोंडावर असताना सांगोला शहरातील रहिवाशांना पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इजारा दिला आहे. नगरपालिकेच्या दिसाळ कारभाराची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ऐन दिवाळीत पाणी टंचाईची स्थिती असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यातच ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने नगरपालिकेचा दिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ऐन दिवाळीत सांगोला शहरात पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. ऐन दिवाळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सांगोला शहराला इसवादी येथील धान्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नगरपालिकेच्या दिसा नियोजनामुळे शहरवासियांना पाणी टंचाईचासामना करावा लागत आहे विद्युत मोटार नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची माहिती नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
शहरातील पाणी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जलकुंभ न भरणे, अनियमित पाणीपुरवठा आदीमुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात पाणी प्रथ सोडविण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. सणासुदीत्त्वा काक्रामध्ये पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
मागील आठवड्यापासून पाणी पुरवठा विस्कबित झाला आहे. दिवाळी सणाच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाणी पुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळेच ग्रामस्थांना पाण्यासाठी टेकतचा आधार घ्यावा लागत आहे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. सांगोला शहरातील पाणी टंचाईची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.