कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीचे बुकिंग मंगळवारपासून सुरू

कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर ही रेल्वे दि.२४ सप्टेंबरपासून सकाळच्या सत्रात शुक्रवार वगळता धावणार आहे. शहीद अशोक कामटे संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे सदरची रेल्वे सुरू होणार असल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. सांगोला तालुक्यातील प्रवाशांना सोलापूर येथून जाण्या व येण्याकरिता ही रेल्वे फार सोईस्कर होणार आहे.

या गाडीस सहा स्लीपर, चार श्री टियर एसी व सहा जनरल कोच असल्याने या गाडीचे बुकींग दि.१६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गाडी कोल्हापूर ते कुडूवाडी दरम्यान सर्व रेल्वेस्थानकांवर थांबेल. तरी सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा. परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे कलबुर्गीहून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल. कोल्हापूर येथे उच्च न्यायालयात कामकाजासाठी जाणाऱ्यांना या गाडीचा फायदा होईल, कारण ही गाडी कोल्हापुरात पहाटे पोहोचेल. या गाडीस हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुडूवाडी, सोलापूर असे थांबे असतील. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले असल्याने त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वकिलांना ये-जा करणे सोपे होईल. रेल्वे सुरू करण्याकरिता खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. प्रणिती शिंदे, चेतनसिंह केदार-सावंत, धर्मवीर मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सततचा पाठपुरावा केल्याने ही मागणी पूर्णत्वास आली आहे.