सांगोला येथे रविवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुले करंजीच्या झाडाला बांधलेला झोका खेळत होते. अचानक दुपारी २: ३० वाजण्याच्या सुमारास जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने तिचे आई- वडील घटनास्थळी धावले असता, त्यांनी ऋतीकाला झोक्याच्या दोरीत अडकलेले पाहिले. तिला त्वरित झाडाखालून बाजूला काढून सांगोला येथील खाजगी दवाखान्यात नेत असताना, एस.टी. स्टँडजवळ तिला उलटी होऊन तिच्या हालचाली थांबल्या.
डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अचानकपणे खेळताना गळफास लागून चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
