माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना आमदार करण्यासाठी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा गतिमान झाली असून राजेंद्र अण्णा आमदार व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल 25 किलोमीटरची पायी दिंडी काढल्याचे पाहायला मिळाले. आटपाडी ते खरसुंडी पर्यंत पायी दिंडी काढून कार्यकर्त्यांनी नाथबाबांसमोर. अण्णा आमदार व्हावेत यासाठी साकडे घातलेले आहे. यावेळी प्रथमेश भिंगे यांनी आटपाडी सूतगिरणी पासून ते खरसुंडीपर्यंतचे अंतर धावत जाऊन पार करत मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. राजेंद्र अण्णांसाठी काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत हर्षवर्धन देशमुख देखील सामील झालेले होते. एकूणच अण्णांच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्यांनी आटपाडीतून चांगलाच त्यांनी जोर धरलेला असून यामुळे आटपाडी मतदारसंघातील राजकीय वातावरण टाइट झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Related Posts
दिव्यांग अनुसे यांनी सायकलने प्रवास करत घेतले अयोध्येत श्रीराम दर्शन
आटपाडी तालुक्यातील अनुसेवाडी येथील दिव्यांग गोरख विठ्ठल अनु या तरुणाने १७ दिवस आटपाडी ते अयोध्या असा सायकलवरून प्रवास करीत श्रीरामाचे…
ग्रामसभेत अनोखा ठराव….
आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ग्रामसभेत…
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला खिंडार! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यात ही भाजपला मोठे खिंडार पडले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आज…