आदर्श सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात

आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सोसायटीच्यावतीने चारचाकी वाहनाचे वितरण सभासद दीपक बाळासाहेब देशमुख यांना करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश दौंडे , उपाध्यक्ष दीपक देशमुख , संचालक महेश देशमुख , राजेंद्र लाटणे ,संचालक उपस्थित होते. विकास भुते यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या .सचिव स्वामी यांनी संस्थेच्या कामाचा आढावा मांडला . कार्यक्रमास एम . बी .कुलकर्णी , नामदेव लोखंडे ,सतीश भिंगे ,महादेव कदम ,अनिल दामोदर उपस्थित होते. सचिव दत्तात्रय स्वामी यांनी आभार मानले