बेनापूर येथील कार्यकर्त्याचे सुहास भैया बाबर यांच्या प्रती जिव्हाळा

स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आपल्या खानापूर- आटपाडी मतदारसंघांमध्ये जिव्हाळ्याचे नाते संबंध होते. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निधन झाल्यामुळे मतदार संघात प्रचंड शोककळा पसरली तसेच मतदारसंघांमध्ये अस्वस्थ वातावरण पसरले होते अशातच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास भैया बाबर यांनी मतदारसंघांमध्ये आपली छाप सोडली आहे.

त्यांनी मतदारसंघांमध्ये आपला संपर्क वाढवला आणि आपल्या कामाचा धडाका सुरू केला. अशातच एक वेगळी घटना समोर आलेली आहे. बेनापूर येथील कार्यकर्त्यांने आपल्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला सुहास बाबर यांना आमंत्रण दिले. सुहास भैय्यांच्या रूपामध्ये अनिल भाऊ अवतरले हा विश्वास मनोमनी धरून त्यांनी सुहास भैयांच्या पावलांचे ठसे जतन केले आहेत.