संकटाच्या काळात महिलेच्या मदतीला धावून आले बाळासाहेब सावंत

पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथे आपल्या माहेरी आलेल्या व सांगली येथे पोलीस पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. महानुर महिला धाराशिव लांजा एसटी बस मधून सांगलीला निघाल्या. सांगोला बस स्थानकावर बस थांबली असता त्यांचे बाळ बेशुद्ध पडले होते. आवाज देऊनही ते बाळ उठत नसल्यामुळे ती महिला घाबरल्या.

बाळ हे हाकेला कोणतीच प्रतिसाद देत नसल्यामुळे बाळाच्या काळजीपोटी हंबरडा फोडू लागली. कोणीतरी मदतीला येईल या आशेने त्या रडत होत्या. परंतु कोणी त्यांच्या मदतीला आले नाही. सांगोला बसस्थानकात हा प्रसंग घडत असताना बाळासाहेब सावंत हे आपल्या ऑफिसला कामासाठी जुनोनी या ठिकाणी निघाले असता बसमध्ये मोठमोठ्याने ओरडत असण्याचा आवाज त्यांच्या काणी पडला.

नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारे सावंत साहेब प्रसंगावधान ओळखून तात्काळ ते बाळ व महिला यांना स्वतः घेऊन फुले चौकातील डॉ. देवकते यांचा हॉस्पिटल गाठला आणि बाळाला दाखल केल. डॉक्टर देवकते यांनी तात्काळ बाळाला औषधोपचार चालू केले. ते बाळ शुद्धीवर आले. सामान्य नागरिकांच्या संकटात मदतीला धावून जाणाऱ्या बाळासाहेब सावंत यांच्या रूपाने त्या महिला पोलिसाला देवच भेटलेला होता त्यामुळे त्या महिलेने बाळासाहेब सावंत यांचे आभार मानले.