आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने गुरुवारपासून शिरोळ व हातकणंगले या दोन मतदारसंघात राजकीय चाचणी सुरू केलेली आहे. दरम्यान सर्वे सुरू झाल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी चारनंतर माध्यमांच्यापर्यंत पोहोचली. विद्यमान आमदारांच्या बद्दलचे मत, विरोधी पक्षाची भूमिका, पिशवीतील संघटन आदिवर सर्वे होत असल्याचे देखील समजत आहे.
