मा.दिपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीसाठी संजय गायकवाड यांच्याकडून एक लाख रुपये निधीची घोषणा!

मा. दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्या सभेमध्ये पतसंस्थेच्या वादीव इमारत निधीचा प्रस्ताव श्री. संजय श्रीकृष्ण गायकवाड यांनी २४ सप्टेंबर २०२२ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूचित केला होता.

त्यास सर्व सभासदांनी १६ सप्टेंबर २०२४ च्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये बहुमताने मंजूर देण्यात आली आहे. सर्व सभासदाचे संचालक मंडळाकडून व वैयक्तिक संजय गायकवाड यांनी मनस्वी आभार व्यक्त केले आहेत. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक, शाळा, अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

सदर सभेमध्ये मा. दीपकआबा साळुंखे पाटील यांचे हस्ते

धनादेश संस्थेच्या चेअरमन कमल खबाले यांना सुपूर्द करण्यात आला.