उमेदवारी अर्ज दाखल करताना मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन……

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्यासाठी सांगोला तालुक्यातील दोन ते अडीच हजार धनगर समाज बांधवांनी आरेवाडी ता.कवठेमंकाळ येथील श्री बिरोबा देवाला नुकतेच साकडे घातले.  मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, गेली 30 वर्षाच्या काळामध्ये सातत्याने सर्व सांगोला तालुक्यातील जनतेचे सेवेमध्ये माझी सेवा समर्पित केलेली आहे आणि माझा उमेदवारी अर्जामध्ये जनतेने मला उमेदवार केलेल आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे. त्यामूळे या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणाने मी चांगल्या मतांनी निवडून विजयी होईण अशी मला मनापासून खात्री आहे.

तसेच या निवडणुकीमध्ये माझ्यासमोर मी कोणतीही आव्हाने समजत नाही. दोन्हीही विरोधक पक्षाचे उमेदवार आहेत त्यातील एक उमेदवार आहेत ते गणपतराव देशमुख यांना सारथ्य करून विजयी करण्यासाठी त्यात आम्ही सहभागी होतो. तसेच ज्येष्ठ बंधू मा. बापू यांना मागच्या विजयामध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण सहभागी होतो.

त्यामुळे सांगोला तालुक्याच्या निवडणुकीची सगळी नाडी गेली 30 वर्ष मला निश्चितपणाने माहिती आहेत आणि मी या तालुक्यातल्या मतदार राजाची गेली 30 वर्षे निरपेक्ष भावनेने सेवा केलेली आहे. यामध्ये मी कधीही जात, पंथ, धर्म कधीही भेदभाव केला नाही. गेली तीस वर्षे अठरा अठरा तास या तालुक्यातल्या जनतेचे काम केलेलं आहे. त्यामुळे मी जनतेचा उमेदवारच आहे आणि म्हणून विक्रमी मतांनी मी ही निवडणूक निश्चितपणाने जिंकणार अशी प्रतिक्रिया दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.