सध्या पितृपंधरवाडा सुरु आहे. या दरम्यान नैवेद्यासाठी सर्वत्र भाज्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी परराज्यातून येणारी फळभाज्यांची आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील भाव गगनाला भिडले आहेत.
भाव वाढीने शेतकरी खुश असला तरी सामान्य माणसांच्या खिशाला याने कात्री लागणार आहे. आधीच महागाईचा भडका उडालेला आहे त्यात फळभाज्या महागल्याने सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.पितृपक्ष सुरू असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. एकीकडे भाज्या महागल्यात तर दुसरीकडे फुलांचा भाव कमी झाला आहे.