महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यांता लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या नाहीत.त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या 15 दिवसांत आंचारसंहिता लागेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोलापूरमध्ये बोलताना अजित पवार यांनी दोन आठवड्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील असे संकेत दिले आहेत.सोलापुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. येत्या 15 दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर काही दिवसांत निवडणुका होतील. त्यामुळे तयारीला लागा आणि सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणा असे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, असे देखील यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी निवडणुकीचे संकेत दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.