सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे आयोजित शेतकरी कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात मोटरसायकल रॅली काढून डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा स्वागत केले. पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कष्टकरी कामगारांसाठी लढणारा कायम आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापची भूमिका आणि धोरण वेगळी आहे त्यामुळे जिल्ह्यात राज्यसह सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वर्गीय आबासाहेबांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले हेच अस्तित्व ओळख आता पुन्हा आपल्याला निर्माण करायचे आहे. आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करू निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचाय शेकाप पुन्हा इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकवून स्व. आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कारभारावर सांगोला तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये टक्केवारी, भ्रष्टाचार व विकास कामांचा घसरलेला दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चीड दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठा जिद्दीन व मनात चीड ठेवून काम करायचे आहे.आपली बांधिलकी गोरगरिबांसोबत आहे त्यांना केंद्रबिंदू बांधून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे.
आगामी निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं जे फितूर होतात त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक असून असा विजय मिळवा की पुन्हा विरोधक उभा राहणार नाही असं मत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.