प्रत्येकाला क्रिकेटचे वेड आजकाल खूपच लागलेले आहे. गावागावात क्रिकेटच्या स्पर्धा रंगलेल्या आपणाला पाहायला मिळतात.
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अद्यावत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनंतर रणजीचे सामने होणार आहेत. आज शुक्रवार (दि. ५) रोजी सकाळी ९.३० पासून महाराष्ट्रविरुद्ध मणिपूर या संघांत पहिली लढत होणार आहे. दरम्यान, रणजी सामन्याची तयारी झाली असून, 5 महाराष्ट्राचा संघ मागील दोन दिवसांपासून पार्क मैदानावर सराव करीत आहे.
सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर मागील २८ वर्षांपूर्वी रणजीचे सामने झाले होते. त्यानंतर सामने झाले नाहीत. पार्क मैदानाची दुरवस्था झाली होती. स्मार्टसिटीच्या माध्यमातून या पार्क मैदानाची दुरुस्ती करण्यात आली. सुसज्ज असे मैदान तयार करण्यात आले. त्यामुळे या मैदानावर रणजीबरोबरच भविष्यात आयपीएलचे सामने होतील, अशा दर्जाचे मैदान तयार करण्यात आले आहे. ५ ते ८ दरम्यान हे सामने रंगणार आहेत.
पहिलाच सामना महाराष्ट्र विरुद मणिपूरमध्ये रंगणार आहेत. दोन्ही संघ सोलपूरात दाखल झाले असून कसून सराव करीत आहेत. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दिलीप माने, श्रीकांत मोरे, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरु आहे.