आष्टा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव पालिकेत केला, मात्र त्याकरिता जागा निश्चित केली नाही. जागेबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आरपारची लढाई लढण्याचा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी दिला आहे.
आष्टा नगरपरिषदेच्यावतीने गत काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव मंजूर केला होता. शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथरा बांधण्यास सुरुवात झाली आहे. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा निश्चित नसल्याने रुकडे कमानी शेजारील नगरपालिकेच्या मोकळ्या जागेची मागणी नगरपरिषदेकडे कांबळे यांनी केली आहे.