राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता प्रतिलिटर ‘इतक’ मिळणार अनुदान! ‘या’ तारखेपासून……

महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. काल अर्थातच 23 सप्टेंबर 2024 ला शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

शेतकऱ्यांसाठी देखील कालच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झालेत.दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागाच्या माध्यमातून देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुढेही राज्यातील दूध अनुदान योजना सुरुचं राहणार आहे. एवढेच नाही तर गाईच्या दुधासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढही करण्यात आली आहे.दुग्ध उत्पादकांना आता गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान मिळणार आहे.