Mazi Ladki Bahin Yojana : ही चूक केलात तर मिळणार नाहीत 1500 रुपये

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडताना गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली.या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिला लाभ घेऊ शकतात.

पण या योजनेसाठी अर्ज करताना जर एक चूक केली तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं.माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एक चूकही तुम्हाला 1500 रुपये मिळण्यापासून वंचित ठेऊ शकते. यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत विधानसभेत बोलताना बँक खात्याविषयी त्यांनी काही सूचना केल्या होत्या.अर्ज भरताना तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे.

याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे. याशिवाय बँकेचं नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे.यामध्ये जर चूक झाली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे बँकेसंबंधी जो काही तपशील आहे तो अगदी नेमकेपणाने भरणं गरजेचं आहे.